पुणे हादरलं! १७ वर्षीय अमनसिंगचा थरकाप उडवणारा निर्घृण खून इन्स्टाग्राम मैत्रीपासून डोंगरातील मृत्यूपर्यंतची भयावह कथा.

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय अमनसिंग सुरेंद्रसिंह गचंड याचा अपहरण करून अत्यंत क्रूर पद्धतीने खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खेड शिवापूर परिसरातील डोंगरातून बुधवारी दुपारी अमनसिंगचा मृतदेह सापडला आणि संपूर्ण शहर हादरून गेलं. हा खून केवळ क्षणिक रागातून झालेला नव्हता, तर थंड डोक्याने आखलेला, नियोजनबद्ध आणि अमानुष असा गुन्हा होता, हे पोलिस तपासातून स्पष्ट झालं आहे. जुन्या वादातून उगम पावलेली सूडाची ठिणगी सप्टेंबर २०२५ मध्ये अमनसिंग आणि प्रथमेश चिंधू आढळ यांच्यात वाद झाला होता. त्या वादात अमनसिंगकडून झालेल्या मारहाणीत प्रथमेशच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. तो अपमान आणि राग प्रथमेशच्या मनात सलत राहिला. यानंतर अमनसिंग विश्रांतवाडी परिसरात राहायला आला, मात्र तो नेमका कुठे आहे हे प्रथमेशला माहिती नव्हतं. मात्र, अमनसिंग सोशल मीडियावर विशेषतः इन्स्टाग्रामवर सतत सक्रिय असल्याचं प्रथमेशच्या लक्षात आलं. त्याच्या स्टेटस, पोस्ट्स पाहून प्रथमेशचा राग अधिकच वाढत गेला. याच रागातून अमनसिंगला संपवण्याचा कट रचण्यात आला. इन्स्टाग्रामवरून रचलेला सापळा प्रथमेशने आपल्या साथीदारांसह एक योजना आखली. एका तरुणीच्या मदतीने अमनसिंगशी इन्स्टाग्रामवर मैत्री केली गेली. “फक्त धमकावायचं आहे” असं सांगून तिला या कटात वापरण्यात आलं. २९ डिसेंबर रोजी त्या तरुणीच्या सांगण्यावरून अमनसिंग दुचाकीवरून खेड शिवापूर येथील वर्तुमुख मंदिराच्या परिसरात पोहोचला. दोघांनी मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर नागेश धबाले तिथे आला. तो अमनसिंगच्या खांद्यावर हात टाकून त्याला पुढे घेऊन गेला आणि दुचाकीवर बसवून डोंगरातील निर्जन भागात नेलं. तिथे आधीच प्रथमेश आढळ आणि इतर आरोपी थांबलेले होते. “शेवटची इच्छा काय?” माणुसकीला काळीमा फासणारा क्षण डोंगरात पोहोचल्यानंतर आरोपींनी अमनसिंगला थेट विचारलं “तुझी शेवटची इच्छा काय?” क्षणभर सुन्न झालेल्या अमनसिंगने बिअर आणि सिगारेटची मागणी केली. धक्कादायक म्हणजे आरोपींनी ती मागणी पूर्ण केली. यानंतर त्यांनी अमनसिंगलाच स्वतःचा खड्डा खोदायला लावला. त्याला त्या खड्ड्यात पुरण्यात आलं. मात्र, तो जिवंत सुटू शकतो, अशी शंका आल्याने त्याला पुन्हा बाहेर काढण्यात आलं. एका आरोपीकडे सर्जिकल ब्लेड होतं. त्याने अमनसिंगच्या गळ्यावर वार केला. रक्त उडालं, पण वार पुरेसा खोल नव्हता. त्यानंतर कोयत्याने गळा चिरण्यात आला आणि डोके दगडाने ठेचण्यात आलं. तीन ते चार तास हा अमानुष “खुनी खेळ” मंदिराच्या डोंगर परिसरात सुरू होता. मृत्यूची खात्री करून पुरलेलं शरीर अमनसिंग मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह त्याच खड्ड्यात पुरून टाकला आणि घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, सकाळी घरातून बाहेर पडलेला अमनसिंग रात्रीपर्यंत घरी न आल्याने त्याच्या आई अनिता गचंड यांनी सर्वत्र शोध घेतला. फोन लागत होता, पण उचलला जात नव्हता. अखेर दुसऱ्या दिवशी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस तपास आणि धक्कादायक कबुली गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान मुख्य सूत्रधार प्रथमेश आढळ आणि त्याचा साथीदार नागेश धबाले यांना बेळगाव (कर्नाटक) येथून ताब्यात घेण्यात आलं. एका अल्पवयीन आरोपीसह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून, दोन आरोपी अल्पवयीन आहेत. सोशल मीडियावरून अमनसिंगला बोलावून घेणाऱ्या तरुणीसह तब्बल ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश आढळ (वय १९, रा. उत्तमनगर) आणि नागेश धबाले (वय १९, रा. शिवणे) यांना न्यायालयाने ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीत प्रथमेशने जुन्या वादातून अमनसिंगचा खून केल्याची कबुली दिली. समाजासाठी धोक्याची घंटा ही घटना केवळ एका खुनाची नाही, तर सोशल मीडियाच्या गैरवापराची, तरुणांमधील वाढत्या हिंसक मानसिकतेची आणि सूडाच्या अंधारात हरवलेल्या माणुसकीची भीषण झलक आहे. १७ वर्षांचा एक मुलगा जो कदाचित आयुष्याच्या नव्या स्वप्नांकडे पाहत होता तो एका जुन्या वादाचा बळी ठरतो, हे आपल्या समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहे. हा गुन्हा आरोपींना शिक्षा देण्यापुरता मर्यादित न राहता, समाजाला जागं करणारा ठरावा, हीच अपेक्षा.

जालियनवाला बाग हत्याकांडचा बदला सविस्तर वाचा…

कुसुमाग्रजांची एक कविता आहे. जिचं नाव जालियनवाला बाग असंय. त्यात एक ओळ अशी आहे की,
मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकांत
जगज्जेत्यांच्या पराक्रमाची स्फूर्तीपद रीत
जालियनवाला बागेत जे हत्याकांड झालं त्यावर आधारित ही कविता आठवण्याचं कारण म्हणजे, आज सरदार उधम सिंग यांची जयंती. आता या जयंतीचा आणि जालियनवाला बागेतील हत्याकांडाचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर उधम सिंग यांचा धाडसी लढा आणि या हत्याकांडाशी असलेला संबंध हे आपण जाणून घेऊ. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
सगळंच विस्ताराने जाणून घेऊ पण त्याआधी आपल्याला रौलट कायदा समजून घ्यावा लागेल. तर काळ होता पहिल्या महायुद्धाचा. ब्रिटिशांच्या सत्तेविरोधात ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या वसाहती होत्या तिथे ब्रिटिशविरोधी कारवाया वाढीस लागलेल्या. ह्यांना आळा बसावा म्हणून, उपाययोजना करण्यासाठी समिती नेमण्यात आली. या समितीचा प्रमुख म्हणून न्यायाधीश असलेल्या सिडने रौलट याला नेमण्यात आलं. या समितीच्या शिफारसींवरून १९१९ साली एक कायदा करण्यात आला. ज्याला रौलट ॲक्ट असंही म्हणलं जातं. या कायद्यानुसार, केवळ संशयावरून, पोलिस कोणालाही अटक करू शकत होते. कोणताही खटला न भरता तुरुंगात दोन वर्षांपर्यंत डांबून ठेवण्याचा अधिकार पोलिसांना दिला गेला. याविरोधात महात्मा गांधींनी सत्याग्रह सुरू केला. देशभरात या कायद्याच्या विरोधात निदर्शने सुरू झाली. गांधीजींच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी अमृतसरमध्ये सभा आयोजित करण्यात आली. आता या सभेआधीच तिथल्या प्रशासनानं मार्शल लॉ लावला. त्यानुसार चार पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई केली गेली. तरीही ब्रिटिशांची दडपशाही न जुमानता, बैसाखी सणाच्या निमित्ताने लोक जमले.वीस हजारांहून अधिक लोक तिथं जमले. लाला हंसराज यांचं भाषण सुरू होतं. तितक्यात ९० सैनिकांच्या मदतीने या जमावावर गोळीबार करण्यात आला. जवळपास दहा मिनिटं चाललेल्या या गोळीबारात बरीचशी माणसं मारली गेली. या सगळ्यात काही लोकांनी जीव वाचवला.त्यापैकी एक तरुण म्हणजे सरदार उधम सिंग. आता थोडंसं या तरुणाच्या बालपणाकडे वळू. पंजाब जिल्ह्यातील आजचा संगरुर जिल्हा. या जिल्ह्यातील सुनाम या गावी त्यांचा जन्म झाला. लहानपणी शेरसिंग असं त्यांचं नाव होतं. त्यांच्या आईवडिलांचे लहानपणीच निधन झाले. पुढे अनाथाश्रमात त्यांचे पालनपोषण झाले. उधमसिंग मॅट्रिक होऊन अमेरिकेला गेले. तिथं त्यांचा संपर्क गदर चळवळीशी आला. अमेरिकेतील भारतीयांनी, भारताच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेली ही चळवळ. या माध्यमातून त्यांचा भगतसिंहांशी संपर्क आला. त्यांच्याच सांगण्यावरून उधमसिंग भारतात परतले. भारतात आल्यानंतर गदर दी गुंज ही पत्रिका प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला आणि लढा सुरू ठेवला. याच दरम्यान बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलं आणि पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. तिथून सुटल्यानंतर मोहम्मदसिंग आझाद हे नाव धारण करून सशस्त्र लढ्यात सामील झाले. पुढे जालियनवाला बागेतील हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी उधमसिंग इंग्लडला गेले. ज्यावेळी जालियनवाला बाग हत्याकांड झालं त्यावेळी ओडवायर हा पंजाबचा गव्हर्नर होता. जनरल डायर यानं हे हत्याकांड घडवून आणल्यानंतर त्याचं समर्थन ओडवायरने केलं होतं. याचा राग मनात ठेवून उधमसिंग यांनी इंग्लडमध्ये कट रचण्यास सुरुवात केली. छोटी मोठी कामं करत त्यांनी उदरनिर्वाह चालू ठेवला. ओडवायर एका कार्यक्रमाला संबोधित करणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. उधमसिंग यांनी पिस्तुलाची जमवाजमव केली आणि सभागृहात प्रवेश करून ओडवायरवर गोळ्या झाडल्या. जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला १३ मार्च १९४० रोजी घेतला गेला. गोळ्या झाडल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर ओडवायरच्या हत्येचा खटला चालून लंडनच्या पेंटोनविले जेलमध्ये त्यांना फाशी दिली गेली.शहीद सरदार उधमसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बात बंजारे चॅनेलला सबस्क्राइब करा.

अटल बिहारी वाजपेयी यांची प्रेमकथा..

अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव घेतलं की नेतृत्व, काव्य आणि राजकारण आठवतं. पण त्यांच्या आयुष्यात एक हळूवार, शांत अशी भावनिक गोष्टही होती—राजकुमारी कौल यांच्याशी जोडलेली.
ग्वाल्हेरमधील व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये शिकत असताना अटलजी आणि राजकुमारी यांची ओळख झाली. त्या काळात कॉलेजमध्ये मुली फारच कमी होत्या. राजकुमारी दिसायला सुंदर, आत्मविश्वासू आणि अभ्यासात हुशार होत्या. अटलजी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे ओढले गेले. ही ओढ मोठ्या शब्दांत कधी व्यक्त झाली नाही, पण ती खोल होती.
दोघांमध्ये मैत्री झाली, एकमेकांविषयी आपुलकी निर्माण झाली. अटलजींनी एकदा लायब्ररीतील पुस्तकात प्रेमपत्रही ठेवले. उत्तर आलं होतं, पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. कदाचित नियतीला ते नातं पुढे न्यायचं नव्हतं.
कुटुंबीयांच्या इच्छेनुसार राजकुमारी यांचा विवाह ब्रज नारायण कौल यांच्याशी झाला. अटलजींनी हे वास्तव शांतपणे स्वीकारलं. कुठलीही कटुता नाही, तक्रार नाही. आयुष्य वेगवेगळ्या वाटांनी पुढे गेलं.
ही प्रेमकहाणी पूर्ण झाली नाही, पण ती अपूर्ण असूनही सुंदर राहिली. कारण ती आदर, संयम आणि मौनाने भरलेली होती. कधी व्यक्त न झालेलं, पण मनात कायम जपलेलं असं हे नातं—अटल बिहारी वाजपेयी यांच्या संवेदनशील मनाचा एक वेगळाच पैलू दाखवून जातं.

संदर्भ / Reference

पुस्तक: Atal Bihari Vajpayee: India’s
Most Loved Prime Minister
लेखन-सागरिका घोष

पुस्तक: Atal Bihari Vajpayee: A Man for All Seasons
लेखन- किंगशुक नाग

युतीचा संदेश मुंबईपुरता, तर शिंदेंची चाल राज्यव्यापी! मनसेसमोर नेतृत्व टिकवण्याचं मोठं आव्हान

मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती ही मराठी मतदारांसाठी एक भावनिक आणि राजकीय संदेश देणारी ठरली असली, तरी या युतीच्या घोषणेनंतर लगेचच घडलेल्या घटनेनं राजकीय गणितं अधिक गुंतागुंतीची केली आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली, तर “मराठी अस्मितेचा मुद्दा” केंद्रस्थानी ठेवत मतदारांना साद घातली. मात्र ही युती मुंबई आणि आसपास केंद्रित असतानाच, राज्याच्या दुसऱ्या टोकाला एकनाथ शिंदेंनी राजकीय डाव टाकत मनसेला थेट धक्का दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेचे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांचा शिंदे गटात प्रवेश हा केवळ पक्षांतर नाही, तर मनसेच्या संघटनात्मक बांधणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा निर्णय मानला जात आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर असताना हा प्रवेश झाला आहे. युती जाहीर होताच मनसेच्या गोटात खळबळ उडणं आणि शिंदे गटाकडून स्थानिक नेतृत्व खेचून नेणं, हा एकनाथ शिंदेंचा “ग्राउंड लेव्हल मास्टरस्ट्रोक” मानला जात आहे. यामुळे ठाकरे–राज युतीचा उत्साह काहीसा कमी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून झाल्याचं चित्र आहे.